मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

कशासाठी? पोटासाठी

जादूचा दिवा हरवून किंवा झिजून गेल्यानंतरच्या सर्वसामान्य अल्लाउद्दिनची गोष्ट ऐकलीय कुणी कधी? किंवा वंडरलॅंडचा पत्ता विसरून गेलेल्या; पोरंबाळं आणि त्यांचे होमवर्क्स, विजबिलं-किराणा, क्रेडिड-कार्डाची बिलं या लबेद्यात गुरफटलेल्या ऍलिसची? किंवा मगलवर्ल्डमधे अडकून पडलेल्या आणि…

२९ नोव्हेंबर, २०१० · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

जादूचा दिवा हरवून किंवा झिजून गेल्यानंतरच्या सर्वसामान्य अल्लाउद्दिनची गोष्ट ऐकलीय कुणी कधी?

किंवा

वंडरलॅंडचा पत्ता विसरून गेलेल्या; पोरंबाळं आणि त्यांचे होमवर्क्स, विजबिलं-किराणा, क्रेडिड-कार्डाची बिलं या लबेद्यात गुरफटलेल्या ऍलिसची?

किंवा

मगलवर्ल्डमधे अडकून पडलेल्या आणि सकाळ-संध्याकाळ इमाने इतबारे लॉग-इन-लॉगाउट करणार्‍या आणि महिनाअखेरीस टाइमशिट भरणार्‍या हॅरीची?

आय वण्डर. कसं असेल त्यांचं आयुष्य?

किंवा खरं तर -

आय डोण्ट वण्डर.

मेघना भुस्कुटे

काहीबाही

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2010/11/blog-post_29.html