मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

सामाजिक

११ नोंदी

  • · ब्लॉग

    शांत काळोखाचे तुकडे

    आमचं घर तेव्हा शहरातल्या टेकडीसदृश भागात होतं. त्यातही चौथा मजला. एका बाजूच्या खिडकीतून उतारावरची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं. त्यात झाडं चिकार. जांभळाची, आंब्याची, वडाची, शिरीषाची जुनी-मोठाली-गर्द झाडं. तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायचे. पूर्वेकडच्या खिडकीतून…

  • · ब्लॉग

    व्हॉट्सॅपचं स्टेटस आणि निवडणुका

    मी व्हॉट्सॅपचं स्टेटस हा प्रकार अजिबात वापरत नसे. पण गेल्या फेब्रुवारीत एक मित्र भेटला होता. तेव्हा राममंदिरप्रकरण भलतंच जोरात होतं. मोदीच्या आणि भाजपच्या धर्माधारित प्रचाराच्या विरोधकांना निवडणुकीबद्दल अजिबात अपेक्षा नव्हत्या. आजूबाजूचे एरवी शहाणेसुरते म्हणावेत असे,…

  • · ब्लॉग

    स्त्रीवाद वगैरे...

    वादात पडणं तसं फार शहाणपणाचं नव्हे. पण कधीकधी आजूबाजूला उठलेला मतामतांचा गल्बला इतका तीव्र असतो आणि तरीही आपल्याला जे म्हणायचं आहे, नेमकं तेच सोडून, इतक्या भलभलत्या गोष्टींवर लोक भलभलतं व्यक्त होत असतात, की आपण तोंड उघडणं ही आपली निकड होऊन बसते. पण संदिग्धपणे हवेत तीर मारून मग…

  • · ब्लॉग

    स्वातंत्र्य की सुरक्षितता?

    गोंडस आणि वरकरणी तर्कशुद्ध, निष्पक्षपाती वाटणाऱ्या भूमिका पुन्हापुन्हा वाचनात येतात. त्याला असलेली लोकप्रियता दिसते आणि आपलं मत ठासून मांडतच राहणं किती महत्त्वाचं आहे, ते जाणवत राहतं. आपल्या आजूबाजूचा समाज स्त्रीस्वातंत्र्याच्या बाबतीत संवेदनशील नाही. वैयक्तिक, सामूहिक, सामाजिक…

  • · ब्लॉग

    थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग!

    पद्मजा गेली. 'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान' असा बोचरा शेरा मारणार्‍या एका मित्राला मी पद्मजा फाटक भेट दिली होती. तेव्हा बर्‍यापैकी वाचन असणारा आणि तरीही पद्मजाच्या लेखनाशी अपरिचित असणारा हा माणूस तिच्या अभिनिवेशरहित मिश्कील…

  • · ब्लॉग

    बोंबील आणि बॅरल

    पुनरुत्पादनाच्या प्रेरणेनं पुरुष आणि स्त्रिया सर्वसाधारणतः एकमेकांकडे आकर्षित होतात हे खरं. पण पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. त्या क्रियेतून मिळणारा आनंद ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्त्रीच्या योनीत पुरुषाचं लिंग या संभोगप्रकाराखेरीज इतर सर्व…

  • · ब्लॉग

    साहित्यसंमेलन आणि मी

    साहित्य संमेलन ही गोष्ट माझ्यासाठी थेट महत्त्वाची नाही. त्यात चालणारे सगळे थेर मला साहित्य या माझ्या आवडत्या गोष्टीबद्दलही उद्वेग आणणारेच असतात. त्यामुळी मी त्यापासून अंतर राखून असते. पण - माझी भाषा, त्यातलं साहित्य आणि त्या साहित्याचा एक लोकमान्य - परंपरागत उत्सव या तीनही…

  • · ब्लॉग

    हॅपी विमन्स डे, बाय दी वे!

    अभिजीतने न दिलेला खो मी घेतला नि हे खरडलं. बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान / प्रगतिशील / पुरोगामी ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं / गावकुसाबाहेरचं असल्यामुळे थोर,…

  • · ब्लॉग

    आणखी एक धार्मिक वगैरे वगैरे

    संवेदचं हे एकदम विचारप्रवर्तक वगैरे पोस्ट वाचून मी ही कमेण्ट खरडायला घेतली, पण ती इतकी मोठी झाली, की तिच्या आकाराची लाज वाटून शेवटी मी हे पोस्टायचंच ठरवलं. खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे…

  • · ब्लॉग

    विरासत

    तशी पूर्ण कोरी पाटी असूच शकत नाही, हे कबूल. पण तरी दर वेळी ’यांनी आमच्यावर अत्याचार केले, आणि आम्ही षंढासारखे त्यांचं वैभव पाहतो आहोत’ हा चरा वागवायलाच हवा का सोबत? ’आमच्यावर’मधल्या धर्माचा संदर्भ देणार्‍या आणि केव्हाच मरून गेलेल्या लोकांशी नातं जोडणार्‍या या धाग्याबद्दल मी…