मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

वाटा आणि मुक्काम

१८ मार्च, २०१२ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

जे जे म्हणायसाठी तगमग होते जिवाची

ते ते सारं निरर्थक आहे हे कळून घेताना

एकाच वेळी आतून भरून येणारे आपण

क्षितिजापर्यंत रिते होत जाताना

आत शिरलेल्या वाळूच्या कणाभोवती

मुकेपणानं मोती विणत जाताना

आधी कधीच न दिसलेल्या रिकाम्या जागा

अर्थपूर्ण मौनांनी भरल्या जाताना

कुठे चाललेले असतो आपण?

वाटा आणि मुक्काम

सारंच तर एकमेकांत मिसळत गेलेलं…

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2012/03/blog-post.html