मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

रेषेवरची अक्षरे २०१२

नमस्कार! ’रेषेवरची अक्षरे’चा पाचवा अंक सादर करताना फार आनंद होतो आहे. मराठीतल्या निवडक ब्लॉगनोंदी प्रकाशित करण्याचा हा उपक्रम राबवताना आम्ही बेहद्द मजा केली. एकमेकांना नवनवीन ब्लॉगांबद्दल सांगितलं. नोंदी निवडताना हमरीतुमरीवर येऊन भांडलो. कंटाळा येईस्तोवर चर्चिलपणा केला. नवनवीन…

८ नोव्हेंबर, २०१२ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

नमस्कार!

’रेषेवरची अक्षरे’चा पाचवा अंक सादर करताना फार आनंद होतो आहे.

मराठीतल्या निवडक ब्लॉगनोंदी प्रकाशित करण्याचा हा उपक्रम राबवताना आम्ही बेहद्द मजा केली. एकमेकांना नवनवीन ब्लॉगांबद्दल सांगितलं. नोंदी निवडताना हमरीतुमरीवर येऊन भांडलो. कंटाळा येईस्तोवर चर्चिलपणा केला. नवनवीन प्रयोग करून पाहिले. काही जमले, काही फसले. पण सगळ्यांत जास्त महत्त्वाचं काय असेल, तर या माध्यमातून लिहिलं जाणार ललित आणि तरुण मराठी मनापासून एन्जॉय केलं. यंदाच्या अंकावर काम करताना इथे साचत गेलेला निरुत्साह आम्हांलाही स्पर्शून गेला, ’या माध्यमाचं काय होणार’ असे तद्दन संमेलनीय गळे आम्हीही काढले नि तरी ’आपण अंक काढायचा, काय व्हायचं ते होवो’ या निष्कर्षावर येऊन आपल्या असुधारणीयपणाबद्दल एकमेकांना टाळ्याही दिल्या. तरीही मजा आलीच! अंक वाचताना मराठी ब्लॉगांच्या भवितव्याची ही चिंता तुम्हांलाही थोडी सतावो आणि तरी तुम्हांला अंक वाचताना भरपूर मजा येवो, हीच शुभेच्छा!

काहीही चुका मिळाल्या, सुधारणा सुचवाव्याश्या वाटल्या, शिव्या-ओव्या द्याव्या-गाव्याश्या वाटल्या, तरी निःसंकोच कळवा!

दिवाळी तुम्हां सर्वांना आनंदाची आणि नेहमीप्रमाणेच सकस साहित्याची जावो. भेटत राहू. :)

मेघना भुस्कुटे

साहित्यादि

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2012/11/blog-post.html