मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

पुस्तक

३० नोंदी

  • · ब्लॉग

    पुस्तकी टिपणे : ०२

    खरेदी केलेल्या वा संग्रहातल्या पुस्तकांचे फोटू डकवू डकवू लोकांना जळवण्याच्या काळात आमचे तत्त्वज्ञान तसे मागासच. परंतु आम्ही त्यास चिकटून आहोत. आमच्या मते : \- घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवावी लागल्यासच व्याकरण, शब्दकोश, तत्त्वज्ञान, चर्चा-समीक्षकी मुलाखती, कविता अशा प्रकारची…

  • · ब्लॉग

    पुस्तकी टिपणे : ०१

    पुस्तके विकत घेऊन वाचण्याला एक अंगचेच मूल्य अलीकडे चिकटवले जाते आहे. मी त्याच्याशी अजिबात म्हणजे अजिबात सहमत नाही. थोडे मऊपणाने बोलायचे, तर तो उधळेपणा आणि थोडे कठोरपणे बोलायचे तर पैसे फेकून साहित्यप्रेम विकत घेण्याचा प्रकार वाटतो. मी स्वतः खूप पुस्तके विकत घेतली, अजूनही घेते. पण…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · २

    इतक्यात वाचलेली पुस्तकं आणि काही अनुत्तरित प्रश्न

    नीतिन रिंढे यांचं 'लीळा पुस्तकांच्या' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन) आणि निरंजन घाटे यांचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' (समकालीन प्रकाशन) ही दोन पुस्तकं इतक्यात वाचली. दोन्हीच्या केंद्रस्थानी पुस्तकवेड आहे. 'लीळा..' हे मुख्यत्वेकरून इंग्रजी पुस्तकविश्वातल्या पुस्तकवेड्यांनी लिहिलेल्या आणि…

  • · ब्लॉग

    अगोचरही वास्तवच असतं

    वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा जयंत पवार लोकवाङ्मय गृह प्रकाशन आपल्याला ज्याचं लेखन स्पर्शून गेलं आहे, अशा लेखकाशी बोलायची संधी मिळाली की एक प्रश्न मला कायम सतावतो. इतकं भारी लिहिणार्‍या माणसाशी, आपण बावळटासारखं जाऊन बोलायचं काय? तर ‘तुम्ही कित्ती भारी लिहिता!' हे? छे छे! पण…

  • · ब्लॉग

    बाई - विजयाबाईंचा कॅलिडोस्कोपिक वेध

    बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास संपादन : अंबरीश मिश्र राजहंस प्रकाशन एखाद्याचं आत्मवृत्त ('लमाण' - डॉ. श्रीराम लागू) किंवा निरनिराळ्या व्यक्तिसापेक्ष कोनांतून इतरांनी रेखाटलेलं त्याचं व्यक्तिचित्र ('तें आणि आम्ही') या दोन्ही घाटांची पुस्तकं मराठी नाट्यवर्तुळात आहेत. खुद्द…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · १

    इतक्यात वाचलेली पुस्तकं ०१

    आणि मग एक दिवस... (जालावरून साभार) पुस्तक रंजक आहे, यात शंका नाही. त्याचं सगळं श्रेय नसीरच्या दिलखुलास निवेदनाला आणि धारदार विनोदबुद्धीला. पण त्यातून त्याच्या अभिनयपद्धतीबद्दल काही महत्त्वाचं वाचायला मिळेल, असं म्हणता? सॉरी! बहुतांश नटांनी नोंदलेली नटाची लक्षणं नसीरनंही नोंदली…

  • · ब्लॉग

    खेळघर

    आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे. मी एका सवर्ण कुटुंबातली, मार्कबिर्कं मिळवणारी, वाचणारी-बिचणारी, मुंबईत राहणारी व्यक्ती. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं अमुक इतपत भान नसलं, तर व्यक्तिमत्त्वात फाउल धरतात; त्यामुळे…

  • · ब्लॉग

    माझ्या मनातला का...

    आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्‍याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक. शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार…

  • · ब्लॉग

    खपाऊ पण पकाऊ पुस्तकं

    संवेदचा खो बघून खरंच त्यानं म्हटल्यासारखी वॉशिंग्टनची कुर्‍हाड हाती आल्यासारखे हात शिवशिवायला लागले. कुणाला झोडू नि कुणाला नको, असं होऊन गेलं. मग लक्षात आलं, एखाद्या लेखकाला अशा प्रकारे लक्ष्य करणं सोपं आहे. एका बाजूला ग्रेस, जी. ए. वा तेंडुलकर. एका बाजूला व.पु., संदीप खरे, मीना…

  • · ब्लॉग

    पूर्ण भाग जाणारं पुस्तक

    सगळं काही शेवटी आलबेल होतं. सगळ्या अडचणी सुटतात. सगळ्या अनाकलनीय कोड्यांची नीट संगतवार उत्तरं मिळतात. सगळ्या दुष्ट लोकांचं वाट्टोळं होतं. सगळ्या सज्जन लोकांचं अखेर यथासांग भलं होतं. नायकाला नायिका मिळते. ते एकमेकांवर संपूर्ण आणि सखोल प्रेम करू लागतात. आणि दोघे सुखाने नांदू…