मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

भाषांतर

६ नोंदी

  • · ब्लॉग

    केल्याने भाषांतर

    भाषांतरित पुस्तकं वाचून वैताग झाला आणि फेसबुकी एक लहानसं टिपण लिहिलं. त्यावर जी चर्चा झाली, ती अनेक प्रकारे फलदायी झाली. म्हणून मूळ टिपण, चर्चेअंती पडलेली भर आणि थोडे निष्कर्ष - अशी त्याच टिपणाची दुसरी आवृत्ती इथे देत आहे. \ \ \ अलीकडे काही भाषांतरित पुस्तकं वाचली. काही लहानपणी…

  • · ब्लॉग

    बाई

    भल्या भल्या देखण्या अप्सरा

    नवल करत बसतात,

    त्यांना काही केल्या उमगत नाही,

    माझ्या देखणेपणाचं गुपित कशात?

    मी काही चिकणीचुपडी गोडगुलाबी नार नाही

    …

  • · ब्लॉग

    वाटेवरल्या मुशाफिरास

    ही फार आवडलेली एक कविता -

    To a Stranger..

    PASSING stranger! you do not know how longingly I look upon you,

    You must be he I was seeking, or she I was seeking, (it comes to me, as of a dream,)

    I have somewhere surely lived a life of joy with you,

    …

  • · ब्लॉग

    बोंबील आणि बॅरल

    पुनरुत्पादनाच्या प्रेरणेनं पुरुष आणि स्त्रिया सर्वसाधारणतः एकमेकांकडे आकर्षित होतात हे खरं. पण पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. त्या क्रियेतून मिळणारा आनंद ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्त्रीच्या योनीत पुरुषाचं लिंग या संभोगप्रकाराखेरीज इतर सर्व…

  • · ब्लॉग

    ऋणांचे हिशेब

    फैज अहमद फैज हा कवी मित्रकृपेनं भेटला. पुरते शब्दार्थ न कळताही भाषेच्या लयीची भूल पडते नि मागून दमदार अर्थ आकर्षण अधिक सखोल करत नेतात, तसं झालं. कवी असण्यातली सगळी वेडं जगून घेणारा हा कवी. बंडखोर, स्वप्नाळू, धुंद प्रेम करणारा, प्रेम पचवून शहाणपणाचं खंतावलेलं पाऊल टाकणारा. तो गायलाही गेला खूप. वेड लागल्यासारखी मी वाचत, ऐकत, समजून घेत सुटले. १३ फेब्रुवारीला या कवीचा जन्मदिन. त्या निमित्तानं हे साहस.

    खरं तर काही ऋणनिर्देश करायला हवेत. पण काही ऋणांतून कधीच मुक्त न होण्यात... वगैरे वगैरे!

    हे शब्दश: / अर्थश: भाषांतर नाही. कवितेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ चिमटीत धरायचा; की कवितेचं कवितापण, तिच्यातला मूड असा प्रश्न अनेकवार पडला. नि फैजच्या शब्दांना हात घालायचं पाप करतोच आहोत, तर न भिता-न कचरता-मनापासून करू, असं म्हणत मी दुसरा पर्याय स्वीकारला. गायत्री नातूनं मागे केलेली चार भाषांतरं आठवून मी खचणारा धीर सावरला. तिचे आभार मानायला हवेत. वाद होऊ शकतो अनेक गाळलेल्या नि घातलेल्या शब्दांवरून. क्रमावरून. प्रतीत होणार्‍या अर्थावरून. कुठे भाषांच्या मर्यादा आहेत, कुठे नादाच्या. मला मर्यादा मान्य आहेत. 'हे सापेक्ष आहे' ही इथे पळवाट म्हणून वापरत नाही, मला खरंच असंच म्हणायचं आहे, की हा कवितेनं 'मला' दिलेला अर्थ आहे नि तो प्रत्येकासाठी निराळा असेल.

    असो. पुरे. एकदाच माफी मागते.

    ही फैज यांची मूळ कविता:

    …

  • · ब्लॉग

    मावशीबोलीतल्या कविता

    संवेदच्या ’खो’ला दिलेलं हे क्षीण उत्तर.

    ही कविता कुणाची ते मला ठाऊक नाही. कुठल्याश्या युगोस्लाव्हियन कवीच्या या कवितेचा कुणीसा हिंदीत केलेला अनुवाद मी विजय पाडळकरांच्या एका लेखात वाचला होता. व्हॅन गॉगनं त्याच्या भावाला लिहिलेल्या पत्रांच्या संदर्भात तिचा उल्लेख झाला होता.

    कविता डोक्यात घट्ट जाऊन बसली.

    अनुवादाचा प्रयत्न केला खरा. पण ‘अनुवाद काही खरा नव्हे गड्या, निदान आपलं काम तरी नक्की नव्हे’ असं आत्मज्ञान देऊनच तो झाला. असो.

    ही मूळ कविता -

    …