मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

काहीबाही

७६ नोंदी

  • · ब्लॉग

    व्हॉट्सअॅपच्या जवळिकीची विश्लेषणे

    फेसबुकच्या तोट्यांबद्दल बरीच चर्चा झाली आहे. मात्र, व्हॉट्सअॅपच्या वापराच्या फायद्या-तोट्यांबद्दल फारसं कोणी बोलत नाही. व्हॉट्सअॅपशी झालेल्या जवळिकीची ही काही विश्लेषणं. (हे टिपण आधी माझ्या फेसबुक भिंतीवर प्रकाशित करण्यात आलं होतं. मग ते 'बिगुल'वरूनही प्रकाशित करण्यात आलं. इथे…

  • · ब्लॉग

    इंद्रियांची वेल पसरत पसरत

    'हम ने देखी हैं इन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो'वर समाधान मानण्यात आपल्याला रस नाही. त्यात बेक्कार गुळमुळीतपणा आणि थोडा बेजबाबदारपणाही आहे हे आपल्याला पहिल्यापासून मान्यच. असं कसं 'नाम न दो'? नाही आपण प्रपोज मारलेलं कधीच एकमेकांना. राखीबिखी तर…

  • · ब्लॉग

    काही नाही

    यंदा

    सोसासोसानं काही नवं विकत घेणार नाही.

    इक्कत, कलमकारी, बाटिक, डबल ढाबू, जयपुरी सूत, ठशाचं सूत, बांधणी... काही नाही.

    वाकवलेल्या तारांचे, पांढऱ्या धातूचे, वाळवलेल्या नि भाजलेल्या मातीचे, लाकडी कोरीवकामाचे, रंगीत लाकडांचे, चमकदार दगडांचे, हत्तींचे नि घुबडांचे, हरणांचे नि सशांचे, मांजरांचे नि पाखरांचे...

    कसले म्हणून नवे कानातले नाही.

    …

  • · ब्लॉग

    स्वातंत्र्य की सुरक्षितता?

    गोंडस आणि वरकरणी तर्कशुद्ध, निष्पक्षपाती वाटणाऱ्या भूमिका पुन्हापुन्हा वाचनात येतात. त्याला असलेली लोकप्रियता दिसते आणि आपलं मत ठासून मांडतच राहणं किती महत्त्वाचं आहे, ते जाणवत राहतं. आपल्या आजूबाजूचा समाज स्त्रीस्वातंत्र्याच्या बाबतीत संवेदनशील नाही. वैयक्तिक, सामूहिक, सामाजिक…

  • · ब्लॉग

    कामं संपली की...

    कामं संपली सगळी,

    की मी मस्त दहा वाजेपर्यंत झोपणार आहे काही दिवस.

    काही म्हणजे काही न करता नुसती लोळत, सिनेमे बघत, पुस्तकं चाळत पडून राहणार आहे दिवसचे दिवस.

    मनात आलं, तर उठून आफ्रिकेतही जाईन फिरायला.

    पण आखणार नाही काहीसुद्धा.

    …

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · २

    इतक्यात वाचलेली पुस्तकं आणि काही अनुत्तरित प्रश्न

    नीतिन रिंढे यांचं 'लीळा पुस्तकांच्या' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन) आणि निरंजन घाटे यांचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' (समकालीन प्रकाशन) ही दोन पुस्तकं इतक्यात वाचली. दोन्हीच्या केंद्रस्थानी पुस्तकवेड आहे. 'लीळा..' हे मुख्यत्वेकरून इंग्रजी पुस्तकविश्वातल्या पुस्तकवेड्यांनी लिहिलेल्या आणि…

  • · ब्लॉग

    भकारी शब्दांची भानगड

    हा ‘दिव्य मराठी’च्या मधुरिमा पुरवणीत लिहिलेला लेख. मृण्मयी रानडे यांच्या पाठपुराव्यामुळे लिहिलेला. इथे तो पूर्वप्रकाशित आहे. पण मला लेखावरचं चित्र तितकंसं आवडलं नाहीय. म्हणून इथे स्वतंत्र देते आहे. माझ्या डोक्यात हातात एखादा गुंड्याभाऊ-स्टाइल सोट्या घेतलेला भ या अक्षराचा…

  • · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ५

    राहत्या शहराचे लागेबांधे ५

    भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ४ \ \ \ कधीकधी स्वप्नातून धसकून जाग येते आणि जाग आलीय की नाही याचाही धड पत्ता लागत नाही. अशा अर्धजागृतीच्या रेषेवर घुटमळत असताना, उठून शू करायला जायचं असतं खरंतर. पण नक्की कोणत्या दिशेनं गेल्यावर या वास्तूची बाथरूम सापडेल त्याबद्दलही संभ्रम. पोटात…

  • · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ४

    राहत्या शहराचे लागेबांधे ०४

    भाग ०१ । भाग ०२ । भाग ०३ \ \ \ माझा एक म्यानेजर मित्र आहे. पहिल्या नोकरीच्या काळात सगळीकडूनच झिलई चढायची असतानाच्या आणि अंगच्या रानवट उद्धटपणाची कोवळीकही ओसरलेली नसतानाच्या दिवसांपासूनचा. आमच्यात चकमकी झडत बर्‍याच. पण गप्पाही होत कसल्याही आडव्यातिडव्या, तुरळक आणि घनदाट.…

  • · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ३

    राहत्या शहराचे लागेबांधे ०३

    भाग ०१ । भाग ०२ \ \ \ आजोळ म्हणजे हमखास मऊ-रेखीव आणि रम्य असलंच पाहिजेत असा एक अलिखित नियम आहे. मी मात्र निर्णयस्वातंत्र्य येताक्षणी ते गोंधळवणारे प्रवास हाणून पाडायला सुरुवात केली, त्यामागे फार काही मेलोड्रॅमेटिक दुःखी कारणं होती असं नव्हे. ज्या गोष्टींनी फार भारून जाण्याची,…