मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

मालिका

लायब्र्यांचे दिवस

५ भाग, कालानुक्रमाने

  1. · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · १

    लायब्र्यांचे दिवस १

    लहानपणी अनुभवलेल्या अनेक जागा आपल्या तत्कालीन आकाराशी इमान राखून असल्यामुळे आपल्याला मोठ्या भासलेल्या असतात. पण मोठेपणी तिथे गेलं, की ‘इतकुशीच होती ही जागा?’ असा विश्वासघात होऊन खट्टू व्हायला होतं. माझ्या पहिल्या लायब्रीच्या बाबतीत तसं होण्याची वेळ सुदैवानं कधीच आली नाही. मी…

  2. · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · २

    लायब्र्यांचे‌‌ दिवस २

    आपल्या हक्काच्या शहरात असताना नाक वर करून, भवतालाला गृहीत धरून, आपल्याच तंद्रीत सुखेनैव चालणारी माणसं परक्या शहरात पडल्यावर जशी व्याकूळपणे आपल्या गावच्या खुणा हुडकत असतात; तसं होऊन मी बंगळूरच्या लायब्रीत गेले. आपण कुठल्यातरी अमराठी ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळात जायचं आहे या…

  3. · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · ३

    लायब्र्यांचे‌‌ दिवस ३

    लायब्री म्हटल्यावर वास्तविक पुस्तकं आठवावीत. पण माझ्या गावातल्या मग्रसंच्या बाबतीत पुस्तकं ही एक गृहीत धरलेली बाब आहे. सरकारी लायब्र्यांमधली पुस्तकं जुनाट, पिवळी पडलेली, जीर्ण, फाटकीतुटकी असतात, वाचावीशी वाटत नाहीत… वगैरे राजपुत्री तक्रारी करणार्‍या लोकांशी वाद घालण्याच्या…

  4. · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · ४

    लायब्र्यांचे दिवस ४

    शाळेत असतानाची बहुतेक वर्षं घरातल्यांचा मुख्य जाच जर काही असेल, तर तो म्हणजे हक्काची लायब्ररी नसणे. लहान मुलांची पुस्तकं पुरेनाशी झालेली आणि मोठ्यांची पुस्तकं वाचायला सेन्सॉर बोर्ड. परिणामी कुणीतरी भेट दिल्याशिवाय, कुण्या जबाबदार जाणत्या माणसानं सुचवल्याशिवाय, वा आईबापांनी वाचून…

  5. · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · ५

    लायब्र्यांचे दिवस ५

    कागदी पुस्तकांशी असलेलं पातिव्रत्य सोडून मला पहिला व्हर्चुअल व्यभिचार करायला लावला तो हॅरी पॉटरच्या अखेरच्या भागानं. जगभर पुस्तक प्रकाशित झालंय, लोक वाचतायत, पण आपल्याला वीकान्तापर्यंत प्रत मिळणार नाही हे असह्य होऊन मी मिळेल तिकडे सॉफ्टकॉपी हुडकायला सुरुवात केली. 'शोधेल तो पाणी…