मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

शहर

४५ नोंदी

  • · ब्लॉग

    शांत काळोखाचे तुकडे

    आमचं घर तेव्हा शहरातल्या टेकडीसदृश भागात होतं. त्यातही चौथा मजला. एका बाजूच्या खिडकीतून उतारावरची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं. त्यात झाडं चिकार. जांभळाची, आंब्याची, वडाची, शिरीषाची जुनी-मोठाली-गर्द झाडं. तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायचे. पूर्वेकडच्या खिडकीतून…

  • · ब्लॉग

    पहिल्यापासून

    एकही चुणी न पडलेल्या काळ्याशार चादरीसारखा समुद्र,

    एखादाच ढग कपाळावर वागवणारं राखीकबरं आकाश.

    फिक्या गोंदणासारखी चांदव्याची बिंदी कोपऱ्यात डौलदार.

    पिवळ्या प्रकाशाचं नि बोथट काळोखाचं कॉकटेल झोकून धुंदावलेले जडपाऊल रस्ते.

    कुठल्याश्या थेटरातून रस्त्यावर सांडलेली गर्दी मूठभर...

    …

  • · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ७

    राहत्या शहराचे लागेबांधे ०७

    ग्लोबल कंटाळ्याचे ढग डोक्यावर जमा होत असताना कानात गुंड्या खुपसून शहरातल्या रस्त्यांवरून चालत सुटावं. काही लावू नये गुंड्यांवर, पण असू द्याव्यात त्या कानात. लोक आपल्याला तिरशिंगराव समजून दूर राहतात. पहिली साताठ मिनिटं आपण आपल्या डोक्यात तडमडत राहतो. मग मात्र कुरकुरलेले आपण…

  • · ब्लॉग

    अजुनी

    अजुनी या शहरात

    लहानग्याच्या तहानेच्या गप्पा ऐकून आपली पाणपिशवी सहज पुढे करतं कुणी समजुतीनं.

    अजुनी भिकारणींचा वैभवशाली इतिहास ठाऊक असलेले पानवाले नांदतात,

    वळचणीला ठेवलेली डबलरोटी सुपूर्त करतात तिला मुक्यानंच,

    आणि अबोलपणे मान हलवत गिऱ्हाइकाकडे वळतात.

    …

  • · ब्लॉग

    कुठवर

    रक्ताच्या नात्यांनी बनलेल्या पुंजक्यापुंजक्यांचं हे शहर

    विचारत राहतं तुम्हांला सतत,

    तुमचं कुटुंब कुठलं?

    जराही ताकद न लावता अमानुष प्रचंडपणाच्या जोरावर लोटत राहतं तुम्हांला अव्याहत,

    गुरुत्वाकर्षणाच्याच सहजतेनं, त्याच्या अदृश्य भिंतींपल्याड,

    …

  • · ब्लॉग

    इस मोड़ से जाते हैं...

    इथेच कुठेतरी आहे ती वाट.

    दोन भिंतींच्या मधल्या सापटीत लपून बसलेली.

    तोंडावर एक अजस्र सिमेंटी शिळा घेऊन.

    नुसतीच गद्य नाही ती.

    त्या शिळेला बघून दचकायला होतं एकेकदा.

    …

  • · ब्लॉग

    सुरी

    'आसमाँनमें... टॅडॅड्यॅंव्.. लाखों तारें...' असं तब्बेतीत गाणाऱ्या नि पोलिसानं शर्टाची इस्त्री घालवली तरी मनावर न घेता दिलखुलासपणे 'क्या साब!' असं विचारणाऱ्या खबऱ्यासारखी स्मार्ट असायची इथली गरिबी.

    आता तिच्यात एक कडूपणा आलाय.

    आपण कुठल्या प्रवाहाच्या धारेला लागलो आहोत हेही न कळता चणे नाहीतर कचऱ्याच्या पिशव्या विकू पाहणाऱ्या करकरीत वृद्ध चेहऱ्यांवरचा निष्प्राण भाव झाकोळतो आता अधूनमधून तिच्या चेहऱ्यावर.

    गर्दीला त्याची दाद नाही नि आहेही.

    पण धावण्याला पर्याय नाही.

    …

  • · ब्लॉग

    कुठूनही कुठेही

    जाता येतं

    कुठूनही कुठेही

    खिशात शंभरेक रुपये असले की.

    अर्धी चड्डी घालून फिरा वा भरजरी साडी नेसून

    फोनवर तासंतास बोलत राहा प्रियकराशी लाडाकोडाचं

    …

  • · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ६

    राहत्या शहराचे लागेबांधे ६

    टळटळीत दुपारी आसमंतावर पेंग चढत असताना तळ्यावरून चालत निघावं. तळं म्हटल्यावर जे काही डोळ्यासमोर येतं त्याला छेद देणारी दृश्यं असतात. वाहत्या रस्त्याकाठी झाडांची सावली नि फरशीचा थंडगार कट्टा धरून काहीही न करत बसलेले, वृद्ध दिसणारे, थकलेले लोक. कुणी डब्यातली सुकी चपाती चाबलणारा.…

  • · ब्लॉग

    ऊन हवंय चमचाभर

    ऊन हवंय चमचाभर.

    सगळं ब्लर झालंय

    कधी रिपरिप

    कधी पिरपिर

    कधी नुसतीच धुकट धुवट ड्रेपरी

    …