मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

साहित्यादि

२५ नोंदी

  • · ब्लॉग

    थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग!

    पद्मजा गेली. 'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान' असा बोचरा शेरा मारणार्‍या एका मित्राला मी पद्मजा फाटक भेट दिली होती. तेव्हा बर्‍यापैकी वाचन असणारा आणि तरीही पद्मजाच्या लेखनाशी अपरिचित असणारा हा माणूस तिच्या अभिनिवेशरहित मिश्कील…

  • · ब्लॉग

    खेळघर

    आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे. मी एका सवर्ण कुटुंबातली, मार्कबिर्कं मिळवणारी, वाचणारी-बिचणारी, मुंबईत राहणारी व्यक्ती. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं अमुक इतपत भान नसलं, तर व्यक्तिमत्त्वात फाउल धरतात; त्यामुळे…

  • · ब्लॉग

    माझ्या मनातला का...

    आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्‍याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक. शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार…

  • · ब्लॉग
    रेषेवरची अक्षरे · ३

    रेषेवरची अक्षरे २०१२

    नमस्कार! ’रेषेवरची अक्षरे’चा पाचवा अंक सादर करताना फार आनंद होतो आहे. मराठीतल्या निवडक ब्लॉगनोंदी प्रकाशित करण्याचा हा उपक्रम राबवताना आम्ही बेहद्द मजा केली. एकमेकांना नवनवीन ब्लॉगांबद्दल सांगितलं. नोंदी निवडताना हमरीतुमरीवर येऊन भांडलो. कंटाळा येईस्तोवर चर्चिलपणा केला. नवनवीन…

  • · ब्लॉग

    खपाऊ पण पकाऊ पुस्तकं

    संवेदचा खो बघून खरंच त्यानं म्हटल्यासारखी वॉशिंग्टनची कुर्‍हाड हाती आल्यासारखे हात शिवशिवायला लागले. कुणाला झोडू नि कुणाला नको, असं होऊन गेलं. मग लक्षात आलं, एखाद्या लेखकाला अशा प्रकारे लक्ष्य करणं सोपं आहे. एका बाजूला ग्रेस, जी. ए. वा तेंडुलकर. एका बाजूला व.पु., संदीप खरे, मीना…

  • · ब्लॉग
    रेषेवरची अक्षरे · २

    रेषेवरची अक्षरे २०११

    मंडळी, सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही. इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे. दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि…

  • · ब्लॉग
    रेषेवरची अक्षरे · १

    रेषेवरची अक्षरे २०१०

    ‘रेषेवरची अक्षरे’चा तिसरा अंक प्रकाशित करत आहोत. इथे जाऊन (किंवा इथे) आवर्जून पाहा नि कसा वाटतोय जरूर कळवा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

  • · ब्लॉग

    शुभ दीपावली

    ’रेषेवरची अक्षरे २००९’ प्रसिद्ध झाला आहे. वाचून नक्की अभिप्राय द्या. सुचवण्या, तक्रारी, दाद - सगळ्यांचं मनापासून स्वागत. शुभ दीपावली!

  • · ब्लॉग

    इन्सेक्युअर्ड

    खूप जिवाजवळच्या माणसांबद्दल आपण मोकळेपणानं आणि तटस्थपणे बोलूच शकत नाही, तसंच काहीसं पुस्तकांबद्दल वाटायचं . अजूनही वाटतं. पण आपल्यातले काही भाग आपल्यातून सोडवून हे असे तळहातावर निरखायला घेतले, म्हणजे मग त्यांच्या निराळ्याच बाजू दिसायला लागतात. आपल्याही. \--- तर पुस्तकं. मला काय…